Ad will apear here
Next
पाच दिवसांच्या गणपतींना रत्नागिरीत निरोप


रत्नागिरी :
पाच दिवसांच्या गणपतींना सोमवारी (१७ सप्टेंबर २०१८) रत्नागिरीत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सायंकाळी मोठ्या मिरवणुका काढून मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी गणपतीबाप्पांचे विसर्जन करण्यात आले. बेंजो, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्ये वाजवून बाप्पांना निरोप देण्यात आला.



गणपतीसह गौरींना ‘पुढल्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करण्यात आले. समुद्रकिनारी भरपूर गर्दी झाली होती. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



दुपारी तीन वाजल्यापासून मिरवणुकांना सुरुवात झाली. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मांडवी समुद्रकिनाऱ्यावर निर्माल्य संकलनासाठी रत्नागिरी नगरपालिका, मत्स्य महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, तसेच रोटरी, लायन्स क्लबने मेहनत घेतली. अवयवदान, देहदानासंदर्भातही येथे जनजागृती करण्यात येत होती.

(विसर्जन मिरवणुकीचे व्हिडिओ सोबत देत आहोत.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZOQBS
 जय गणेश👌💐
मांडवी किनारा खरोखरच गर्दीने फुलला.
मिरवणूक पाहून प्रसन्न वाटले1
Similar Posts
सोहळा बाप्पाचा स्पर्धेला प्रतिसाद रत्नागिरी : रत्नागिरी तालुका पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘सोहळा बाप्पाचा’ या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीच्या अनोख्या स्पर्धेला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीत प्रथमच अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत ५० गणपतींचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. २० व्हिडिओ फेसबुक पेजवर अपलोड झाले असून, सुमारे दहा हजार जणांनी या पेजला भेट दिली आहे
गणपतीच्या स्वागताची शिस्तबद्ध मिरवणूक रत्नागिरी : अलीकडे उत्सवांमध्ये थिल्लरपणाचे प्रमाण वाढत चाललेले असताना रत्नागिरी शहराजवळील कर्ले-आंबेशेत गावातील मिरवणुकीने मात्र जाणीवपूर्वक परंपरा जपून ठेवली आहे. गावातील घरगुती गणपतींची आगमन मिरवणूक १३ सप्टेंबरला दर वर्षीप्रमाणेच दिमाखदार पद्धतीने काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत कोणतेही हिडीस नृत्य, धिंगाणा याला स्थान नसते
मूर्तिकलेतून ‘परमानंद’ घेणारे कुटुंब रत्नागिरी : रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या भाट्ये येथील किनाऱ्यावरील झरीविनायक मंदिरातील मूर्तीचे मूर्तिकार, दिवंगत जनार्दन भिकाजी पिलणकर व घनःश्याम भिकाजी भाटकर यांचा वारसा प्रख्यात मूर्तिकार परमानंद पिलणकर यांनी जपला आहे. तसेच त्यांचा मुलगा अक्षय पिलणकर व पुतण्या सिद्धराज मुरारी पिलणकर
ठाण्यात भर पावसात दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप ठाणे : मंगळवारी (तीन सप्टेंबर) ठाण्यात भर पावसात दीड दिवसाच्या गणपतीबाप्पांना निरोप देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाण्यातील सगळ्या विसर्जन घाटावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ३९ हजार ९१२ गणपतींना मंगळवारी निरोप देण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language